भिरवंडे -रामेश्वर मंदिरातील वार्षिक अखंड हरिनाम सप्ताहाला ७ फेब्रुवारीपासून प्रारंभ
कणकवली ता.०४-:* कणकवली तालुक्यातील भिरवंडे गावातील रामेश्वर मंदिरातील वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह सोमवार ७ फेब्रुवारी ते सोमवार १४ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत साजरा केला जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा ७ फेब्रुवारीला दुपारी २ वाजता घटस्थापना होणार आहे. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने अखंड हरिनाम सप्ताहातील भजनांच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. यंदा गावाबाहेरील दिंडी, मेळे, चित्ररथ यांना निमंत्रण देण्यात…
