Headlines

वेंगुर्ला नगरपरिषद मार्फत भविष्यात अधिक चांगले उपक्रम….

श्री. दिलीप गिरप ; रेन वॉटर हार्वेस्टिंग मॉडेल’ मध्ये मदर तेरेसा स्कुल प्रथम

वेंगुर्ला
वेंगुर्ला नगरपरिषद मार्फत आज बुधवार 29 जुलै रोजी स्वामी विवेकानंद सभागृह येथे माझी वसुंधरा अभियान 7. 00 व स्वच्छ सर्वेक्षण 2026 अंतर्गत “रेन वॉटर हार्वेस्टिंग मॉडेल तयार करणे” या उपक्रमवजा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील (इयत्ता आठवी ते दहावी गट ) हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी विविध 9 मॉडेल बनविले होते. यामध्ये मदर तेरेसा स्कूल वेंगुर्ला (एकता वेंगुर्लेकर, शताश्री गोसावी, रिद्धी जाधव ) ने प्रथम क्रमांक पटकावीला. वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला (प्रतीक रणभीसे) ने द्वितीय क्रमांक आणि रा. कृ. पाटकर हायस्कूल (श्लोक महाजन ) यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच या उपक्रमात सहभागी हायस्कुलमधील अन्य विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी वेंगुर्ला नगरपरिषद नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, प्रभारी मुख्याधिकारी संकेत गायकवाड, परीक्षक प्रा. वीरेंद्र देसाई, परीक्षक सुनिता स्वामी, विषय समिती सभापती प्रणव वायंगणकर, गौरी मराठे व गौरी माईंणकर तसेच अन्य नगरसेवक आदी उपस्थित होते. या स्पर्धेचे परीक्षण प्रा. वीरेंद्र देसाई व सुनिता स्वामी यांनी केले. यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, प्रा. वीरेंद्र देसाई यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग चे महत्व सविस्तर विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप परुळेकर यांनी केले.

You cannot copy content of this page