Headlines

गुरुपौर्णिमा निमित्त भाजपा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विष्णू परब यांची गुरुवंदना….

वेंगुर्ला
“गुरुपौर्णिमा” दिवसाचे औचित्य साधून भाजपा वेंगुर्ला कमिटी कडून तालुकाध्यक्ष विष्णू परब यांच्या हस्ते परमपूज्य हरे कृष्ण पोळजी महाराज यांची पाद्यपूजा करण्यात आली.
संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज समरसता संकल्प अभियान भारतीय जनता पार्टी यांनी त्यांच्या ६५० व्या जयंती निमित्त संपूर्ण देशात ऐतिहासिक, सामाजिक,सांस्कृतिक,याद्वारे अभियान राबविण्याचा संकल्प केला आहे.
त्या अंतर्गत भाजपा वेंगुर्ला कमिटी कडून “गुरुपौर्णिमा” दिवसाचे औचित्य साधून तालुकाध्यक्ष विष्णू परब यांच्या हस्ते आसोली येथील परमपूज्य हरे कृष्ण पोळजी महाराज यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची पाद्यपूजा केली. त्यांचप्रमाणे त्यांना श्रीफळ,पंचफळे,शाल,वस्त्र,अर्पण करुन त्यांचा सन्मान करण्यात आला.
या वेळी या कार्यक्रमाला तालुका सरचिटणीस वसंत तांडेल, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, वेंगुर्ला नगरसेवक सचिन शेटये,आसोली ज्येष्ठ भाजप पदाधिकारी प्रकाश रेगे,आसोली पंचायत समिती सदस्य संकेत धुरी,आसोली भाजप ज्येष्ठ पदाधिकारी गुरु घाडी,वेंगुर्ला तालुका भाजप पदाधिकारी मारुती दोडशानट्टी,भाजप शिरोडा शक्ती केंद्र प्रमुख मयूरेश शिरोडकर,शिरोडा भाजप ज्येष्ठ नेते अनिल गावडे,भाजप शिरोडा युवा नेता संतोष धानजी आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page