Headlines

मनसेच्या पुढाकारातून वेंगुर्ल्यात शाळांमध्ये वह्या व वॉटर बॉटलचे वाटप

कुडाळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांतर्गत वेंगुर्ला तालुक्यातील विविध मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गोरेगाव विभाग सचिव घनश्याम परब यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले, तर मनसे वेंगुर्ला शहरचे डॉ. अभि वनकुद्रे यांच्या पुढाकारातून मोचेमाड येथील शाळेतील विद्यार्थ्यांना वॉटर बॉटलचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमाअंतर्गत सरस्वती विद्यालय आरवली, टाकपूर्ण प्राथमिक शाळा रेडी क्र. १, पूर्ण प्राथमिक शाळा शिरोडा क्र. १, पूर्ण प्राथमिक शाळा मोचेमाड तसेच श्रीरामवाडी, कोचरा येथील मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. नव्या शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
यावेळी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुकाध्यक्ष सनी उर्फ गोपाळ बागकर, उपतालुकाध्यक्ष महादेव तांडेल, महाराष्ट्र सैनिक वेंगुर्ला शहरचे डॉ. अभि वनकुद्रे, विभागाध्यक्ष प्रमोद गावडे, विनायक फटनाईक, राजन सारंग, महाराष्ट्र सैनिक सनी राणे, मंदार चोपडेकर यांच्यासह पालक, शिक्षकवृंद आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page