आम. दीपक केसरकर यांचा सावंत परिवारातर्फे सत्कार
सावंतवाडी ता.०४- :* सावंतवाडीमध्ये प्रथमच सुरु होत असलेल्या ‘द ज्यूस लँड’चे उदघाटन माजी गृहराज्य मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील रामेश्वर प्लाझामध्ये आज हा भव्य आणि शानदार उदघाटन सोहळा पार पडला. यानिमित्त आमदार केसरकर यांचा सावंत परिवारातर्फे शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी नगरसेविका दीपाली सावंत उपस्थित होत्या. ‘द ज्यूस लँड’ला मुंबईमध्ये उदंड प्रतिसाद मिळाला असून त्यानंतर सावंतवाडी येथे दुसरी शाखा सुरु करण्यात आली आहे. मुंबईप्रमाणेच येथेही उदंड प्रतिसाद मिळेल, असा विश्वास सिद्धी सावंत यांनी व्यक्त केला.

