चूकीच्या माणसाला निवडून दिल्याचे प्रायश्चित म्हणून आत्मक्लेश आंदोलन:संदेश पारकर

आप्पासाहेब आम्हाला माफ करा;शिवसेनेने वेधले लक्ष

कणकवली ता.०४-:* कणकवली विधानसभा मतदार संघाचे आम.नितेश राणे यांच्यावर विविध प्रकारचे २७ गुन्हे दाखल आहेत .आप्पासाहेब पटवर्धन यांच्या या पवित्र भूमित एका आमदारावर एवढे गुन्हे दाखल असण्याची ही पहिलीच वेळ आली . आपण चूकीच्या माणसाला निवडून दिले , त्यामुळे आप्पासाहेब आम्हाला माफ करा अशी प्रार्थना करीत आम्ही हे आत्मक्लेश आंदोलन या मतदारसंघातील जनतेच्यावतीने करत असल्याचे शिवसेना नेते संदेश पारकर यांनी सांगितले .

वागदे येथील गोपुरी आश्रम येथील आप्पासाहेब पटवर्धन यांच्या पुतळ्यासमोर शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या नेतृत्त्वाखाली महाविकास आघाडीच्यावतीने आत्मक्लेश आंदोलन सुरू करण्यात आले . यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर , शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले , प्रमोद कावले, रूपेश नार्वेकर, निलम पालव-सावंत, संतोष परब, कन्हैया पारकर, हर्षद गावडे , आनंद ठाकूर , शेखर राणे , रुपेश आमडोसकर , ललीत घाडीगांवकर बंडू चव्हाण , संजय पारकर , गौरव हर्णे , भालचंद्र दळवी , रवी गावडे , सुदाम तेली , निसार शेख , सुनिल पारकर ,अमित मयेकर, बाळू पारकर व इतर उपस्थित होते .

शुक्रवारी सकाळी १० वा . पासून संदेश पारकर यांनी हे आत्मक्लेश आंदोलन सुरू केले होते . यावेळी शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते . दुपारी २ वाजेपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे श्री . पारकर म्हणाले . आत्मक्लेशामागील भूमिका सांगताना श्री . पारकर म्हणाले ,आमदार नितेश राणे यांच्यावर शिवसेना कार्यकर्त्यावर हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात आली . सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच एका आमदाराला हाफ मर्डरच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. तो आमदार अप्पासाहेब पटवर्धन यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कणकवलीच्या भुमीतील आहे. आम्ही एका गुंडप्रवृत्तीच्या आमदाराला निवडुन दिलेल्या चुकीचे प्रायश्चित लोकांच्यावतीने आपण हे आत्मक्लेश आंदोलन सुरू केले असल्याचे शिवसेना नेते संदेश पारकर यांनी सांगितले .

You cannot copy content of this page