‘द ज्यूस लँड’चे आज सावंतवाडीत उदघाटन

आमदार दीपक केसरकर, संजू परब यांची प्रमुख उपस्थिती

सावंतवाडी ता.०४- : मुंबईमध्ये मिळविलेल्या उदंड प्रतिसादानंतर आता सावंतवाडीमध्ये प्रथमच सुरु होत असलेल्या ‘द ज्यूस लँड’च्या दुसऱ्या शाखेचा उदघाटन सोहळा आज , ४ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता रामेश्वर प्लाझा येथे आयोजित करण्यात आला आहे. शाखेचे उदघाटन माजी गृहराज्य मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे, ए.सी. पी. उत्तम कोले (मुंबई), कुबनपच्या नगरसेविका शीतल राऊत, बदलापूरचे शिवसेना उपशहरप्रमुख प्रवीण राऊत, नगरसेविका दीपाली सावंत, माजगाव सरपंच दिनेश सावंत, आर. के. सावंत आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सिद्धी सावंत यांनी केले आहे.

You cannot copy content of this page