भिरवंडे -रामेश्वर मंदिरातील वार्षिक अखंड हरिनाम सप्ताहाला ७ फेब्रुवारीपासून प्रारंभ

कणकवली ता.०४-:* कणकवली तालुक्यातील भिरवंडे गावातील रामेश्वर मंदिरातील वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह सोमवार ७ फेब्रुवारी ते सोमवार १४ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत साजरा केला जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा ७ फेब्रुवारीला दुपारी २ वाजता घटस्थापना होणार आहे.

त्यानंतर पारंपरिक पद्धतीने अखंड हरिनाम सप्ताहातील भजनांच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. यंदा गावाबाहेरील दिंडी, मेळे, चित्ररथ यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. मात्र, बाहेरील भक्तमंडळी भजन दिंडी घेऊन हरिनाम सप्ताह मध्ये सहभागी होणार आहेत. त्यांचे संचालक मंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीने स्वागत केले जाणार आहे. यंदा अखंड हरिनाम सप्ताहातील दुपारच्या सत्रातील महाप्रसादाचे नियोजनही करण्यात आले आहे. अखंड हरिनाम सप्ताह पूर्वी मंदिराची रंगरंगोटी पूर्ण झाली असून सध्या विद्युत रोषणाईचे काम सुरू आहे. तसेच मंदिरातील अंतर्गत सजावटीचे कामही सुरू आहे. यंदा रामेश्वर मंदिरातील अखंड हरिनाम सप्ताह प्रतिवर्षाप्रमाणे साजरा केला जाणार आहे.

You cannot copy content of this page