महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा श्रुतिका कडू आणि प्रदेश सरचिटणीस विनोद पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा संपन्न…
देवगड-: इंटरनॅशनल ह्यूमन राईट्स अँबेसेडर्स ऑर्गनाझेशन या संघटनेची विशेष सभा जामसंडे सांस्कृतिक भवन या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा डॉ सौ .श्रुतिका कडू प्रदेश सरचिटणीस विनोद पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
या वेळी तालुका अध्यक्ष दयानंद तेली,उपाध्यक्ष विलास रुमडे,जिल्हा समन्वयक सुरेश (पपु)कदम,मीडिया प्रेसिडेंट दयानंद मांगले,महिला अध्यक्षा सौ दीक्षा तेली,अपंग संघटना जिल्हा अध्यक्ष किशोर पाध्ये उपस्थित होते.या निमित्ताने संघटनेच्या नवीन सभासदांना नियुक्तीपत्र,ओळखपत्र,बॅच प्रदान करण्याचा कार्यक्रम मान्यवर पदाधिकारी यांच्या हस्ते पार पडला.तसेच सौ.श्रुतिका कडू,यांची यांची अखिल भारतीय पत्रकार हक्क संसद समिती वर निवड झाल्याबद्दल तसेच मीडिया प्रेसिडेंट दयानंद मांगले यांचा पुरस्कार निवडीबद्दल संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपाध्यक्ष विलास रुमडे यांनी प्रास्तविक करून संघटनेची उद्देश, ध्येय ,कार्य याविषयी सविस्तर माहिती दिली.मीडिया प्रेसिडेंट दयानंद मांगले यांनी मार्गदर्शन केले .त्याचबरोबर महिला प्रदेश अध्यक्षा सौ श्रुतिका कडू यांनी मार्गदर्शन करून पुढील उपक्रमांची दिशा ठरविण्यात आली.
समाजातील प्रत्येक घटकाला न्याय विविध योजना लाभ मिळवून देण्याकरिता विविध शासकीय ,प्रशासकीय स्तरावर प्रयत्न करण्याचे या विशेष सभेत ठरले. यावेळी देवगड तालुका अपंग अध्यक्ष प्रकाश जाधव, देवगड एज्युकेशन अध्यक्ष तुकाराम तेली, देवगड तालुका महिला उपाध्यक्ष सौ शुभांगी तेली, तसेच रविकांत चांदोस्कर,रवींद्र चिंदरकर,नंदकिशोर परब सभासद कौस्तुभ काळे ,उमेश कुबडे, गिरीश धोपटे ,शरद लाड ,सचिन देशपांडे, पद्माकर राऊत, डॉ. किरण पाटणकर ,ऍड अमेय गुमास्ते,संजय कोयंडे,निलरत्न मालंडकर, महिला सभासद सौ प्रीती वाडेकर, सौ दीपिका मेस्त्री,साक्षी कुबल,तृष्णा जाधव उपस्थित होत्या.
