कणकवली ता.०४-:* गेल्या काही वर्षापासून तालुका प्रवाशी संघ कणकवलीच्या वतीने देण्यात येणारे विविध क्षेत्रांतील सन्मान पुरस्कार यंदाही जाहीर करण्यात आले आहेत . यामध्ये कणकवली तालुका पत्रकार समिती, तालुका प्राथमिक शिक्षक समितीसह १० जणांना गौरविण्यात येणार आहे . हा सन्मान सोहळा रविवार ६ फेब्रुवारीला सकाळी १० वा . महाराजा हॉटेल आयोजित केला आहे . कणकवली तालुका प्रवासी संघ , कणकवलीवतीने रथसप्तमीचे औचित्यसाधून हे सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात येतात .
यावर्षी या पुरस्कारामध्ये एकात्मिक बाल विकास अधिकारी अमोल दिनकर पाटील , आरोग्यसेविका सौ . नयना अभिजीत मुसळे , आरोग्यसेवक उदय शांताराम बुचडे , संचालिका दीपिका दीपक रांबाडे , नीलेश हरिश्चंद्र चिंदरकर , वैष्णवी विठ्ठल ठाकूर , समीक्षा सुदीन खानोलकर , चंद्रकांत अशोक माने यांचा समावेश आहे . हे सन्मान कोरोनाच्या काळात सामाजिक , शैक्षिणक , वैद्यकीय क्षेत्रात काम केलेल्या व्यक्तींचा हा सन्मान आहे. या सोहळ्याच्यानिमित्ताने अपघात विषयक नियम , अपघात विमा फायदे या विषयावर परिवहनचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत . या कार्यक्रमात नगराध्यक्ष समीर नलावडे , रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ . विद्याधर तायशेट्ये , तहसीलदार रमेश पवार , पोलीस अधिकारी सचिन हुंदळेकर , एकात्मिक बाल विकास अमोल पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत . या कार्याक्रमास संस्थेचे पदाधकारी , संचालक , सभासद , प्रवासी नागरिकांनी उपस्थित रहावे , असे आवाहन प्रवासी महासंघाचे अध्यक्ष मनोहर पालयेकर व सचिव श्रद्धा कदम यांनी केले आहे .
