Headlines

सत्ता असताना आरोग्य सभापतींना दुर्गंधी का नाही जाणवली

राष्ट्रवादीचे संतोष जोईल यांचा सुधीर आडीवरेकर यांना सवाल *⚡सावंतवाडी ता.२५-:* सावंतवाडी नगरपालिकेवर गेली २ वर्ष भाजपची सत्ता असताना आणि प्रामुख्याने सुधीर आडीवरेकर हे आरोग्य सभापती असताना ह्या प्रकल्पामुळे नागरिकांना होणारा त्रास आणि सर्वत्र पसरणारी दुर्गंधी दिसत नव्हती का? असा सवाल राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष संतोष जोईल यांनी सुधीर आडीवरेकर यांना केला आहे.

Read More

राष्ट्रवादीतून कुणाचीही नाही हकालपट्टी ;

पक्षशिस्त पाळण आवश्यक : अमित सामंत सावंतवाडी : पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवून राष्ट्रवादीच्या जिल्हा पदावर काम करणाऱ्या तिघा पदाधिकार्‍यांची हकालपट्टी झाल्याची चर्चा होती. मात्र, असा कोणताही प्रकार घडला नसून कुणाचीही हकालपट्टी करण्यात आली नाही आहे. पक्षासाठी एक एक कार्यकर्ता महत्वाचा असून पक्षशिस्त पाळण आवश्यक आहे. पक्षशिस्त पाळली न गेल्यास कारवाई केली जाते. त्याप्रमाणे पक्षशिस्त…

Read More

शिक्षक भारतीचा “नारीशक्ती पुरस्कार” सौ.श्रावणी सतीश मदभावे यांना प्रदान

कणकवली ता.२५-:* विश्व महिला दिनाचे औचित्य साधून शिक्षक भारती सिंधुदुर्गच्यावतीने जिल्ह्यातील स्त्री शक्तीचा सन्मान करण्यात आला. यावेळी वैभववाडी तालुक्यातील नाधवडे गावच्या सौ. श्रावणी सतीश मदभावे यांचा शैक्षणिक,सामाजिक व व्यसनमुक्ती क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल गौरव करण्यात आला. शिक्षक भारतीच्या या पुरस्कार प्रदान सोहळ्याला वैभववाडीचे ज्येष्ठ नागरिक स्वातंत्र्य सेनानी कॅप्टन जे.के.रावराणे,सौ. रावराणे,सिनिअर कॉलेज वैभववाडीचे प्रा.एस. एन.पाटील,प्रसिद्ध लेखक कवी…

Read More

स्वबळावर निवडणूक लढवण्याची कोणाला खुमखुमी असेल तर त्यांनी त्याची परीक्षा घ्यावी…

अमित सामंत; परिस्थिती समजून स्वबळाची भाषा करा सावंतवाडी ता.२५-: सद्य परिस्थितीत समजून स्वबळाची भाषा करावी असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आपल्या मित्र पक्षांना दिला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असताना देखील आमच्या पक्षाचे सर्वच नेते महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्यासाठी प्राधान्य देत असताना देखील, मित्र पक्षातील काही नेत्यांना स्वबळावर लढण्याची खुमखुमी…

Read More

राष्ट्रवादीचा सावंतवाडीत काँग्रेस-शिवसेनेला धक्का…

काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष तर शिवसेनेचे माजी उपशहर प्रमुखांचा प्रवेश; अमित सामंत व अर्चना घारे परब यांच्या उपस्थितीत प्रवेश सावंतवाडी ता.२५-:आगामी नगरपालिकेच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना आणि काँग्रेस पक्षाला जोरदार धक्का दिला असून, दोन्ही पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत आणि सावंतवाडी विधानसभा अध्यक्षा अर्चना घारे परब यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यावेळी…

Read More

कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या सहविचार सभेत अनेक प्रश्‍नांवर सकारात्मक चर्चेतुन ठोस निर्णय

कणकवली ता.२५-:* कास्ट्राईब शिक्षक संघटनेची सहविचार सभा कास्ट्राईब महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम यांच्या नेतृत्वा खाली माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ . मुश्ताक शेख यांच्या दालणात झाली. यावेळी कास्ट्राईब शिक्षक संघटना राज्य सरचिटणीस आकाश तांबे, जिल्हाध्यक्ष रविन्द्र तांबे, जिल्हा महासचिव शेषकुमार नाईक, अभिजित जाधव , नचिकेत पवार भिमराव येडगे, सुधीर तांबे, राजेन्द्र कांबळे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर…

अल्पसंख्यांक जिल्हा कार्यकारणीची नव्याने करणार बांधणी; प्रदेश अध्यक्ष महंमद पठाण, प्रदेश उपाध्यक्ष सुल्तान मालदार देखील असणार उपस्थित… सावंतवाडी ता.२५-:राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री महंमद खान पठाण यांनी सिंधुदुर्ग जिल्हा अल्पसंख्यांक कार्यकारणी बरखास्त केली असून, या कार्यकारणीची नव्याने बांधणी करण्यासाठी आज दिनांक २५ मार्च रोजी अल्पसंख्यांक विभाग राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद विद्रोही, महाराष्ट्र…

Read More

गोवा बनावटीची दारु बाळगल्याप्रकरणी गुन्हा;

सुमारे 10 हजाराचा मुद्देमाल जप्त;स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कारवाई सावंतवाडी ता.२४-:करिवडे येथील एका दुकानावर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागावाकडून धाड टाकत कारवाई करण्यात आली.ही कारवाई आज सायंकाळी सुमारास करण्यात आली असून यात 10,000 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर गोवा बनावटीची दारू बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. करिवडे येथील एका दुकानात गोवा बनावटीच्या दारूची…

Read More

प्रा. चारुशीला राणे यांना पीएचडी पदवी प्रदान

वैभववाडी ता.२४ संजय शेळके-:* राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथील सहाय्यक प्राध्यापिका श्रीमती चारुशीला विजय राणे यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विद्याशाखेत डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच.डी) पदवी प्रदान करण्यात आली. लोरे नं. २ येथील रहिवासी व शिक्षण संस्थेचे पदाधिकारी श्री यशवंत पांडुरंग रावराणे यांच्या त्या स्नुषा होतं. त्यांच्या अभ्यासाचा विषय डेटा एम्बेड करण्यायोग्य…

Read More

अवैध वाळू वाहतूक करणारे दोन डंपर मालवण तहसीलदारांनी पकडले 

मालवण तहसीलदार यांची आचरा येथे धडक कारवाई मालवण ता.२४-:* अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यां 2 डपंरवर मालवण तहसीलदार यांच्या भरारी पथकाने गुरुवारी दुपारी आचरा येथे कारवाई केली. कारवाईत जप्त केलेले सदर डपंर आचरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. मालवण तहसीलदार यांचे भरारी पथक फिरत असताना आचरा मालवण रस्त्यावर हे डपंर विनापास वाळूवाहतुक करताना मालवण तहसीलदार अजय…

Read More
You cannot copy content of this page