राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर…

अल्पसंख्यांक जिल्हा कार्यकारणीची नव्याने करणार बांधणी; प्रदेश अध्यक्ष महंमद पठाण, प्रदेश उपाध्यक्ष सुल्तान मालदार देखील असणार उपस्थित…

सावंतवाडी ता.२५-:राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री महंमद खान पठाण यांनी सिंधुदुर्ग जिल्हा अल्पसंख्यांक कार्यकारणी बरखास्त केली असून, या कार्यकारणीची नव्याने बांधणी करण्यासाठी आज दिनांक २५ मार्च रोजी अल्पसंख्यांक विभाग राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद विद्रोही, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री महंमद खान पठाण आणि प्रदेश उपाध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक श्री. सुल्तान अकबर मालदार हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार असून, यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधून नवीन कार्यकारणी तयार करत जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती अल्पसंख्यांक विभाग सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक सुल्तान मालदार यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page