गोवा बनावटीची दारु बाळगल्याप्रकरणी गुन्हा;

सुमारे 10 हजाराचा मुद्देमाल जप्त;स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कारवाई

सावंतवाडी ता.२४-:करिवडे येथील एका दुकानावर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागावाकडून धाड टाकत कारवाई करण्यात आली.ही कारवाई आज सायंकाळी सुमारास करण्यात आली असून यात 10,000 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर गोवा बनावटीची दारू बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

करिवडे येथील एका दुकानात गोवा बनावटीच्या दारूची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला सुत्रांमार्फत मिळाली होती त्यानुसार त्यांच्या पथकाने त्या दुकानावर धाड टाकत ही कारवाई केली यात दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

You cannot copy content of this page