प्रा. चारुशीला राणे यांना पीएचडी पदवी प्रदान

वैभववाडी ता.२४ संजय शेळके-:* राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथील सहाय्यक प्राध्यापिका श्रीमती चारुशीला विजय राणे यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विद्याशाखेत डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच.डी) पदवी प्रदान करण्यात आली. लोरे नं. २ येथील रहिवासी व शिक्षण संस्थेचे पदाधिकारी श्री यशवंत पांडुरंग रावराणे यांच्या त्या स्नुषा होतं.

त्यांच्या अभ्यासाचा विषय डेटा एम्बेड करण्यायोग्य टेक्सचर सिंथेसिसचे कार्यप्रदर्शन, मूल्यांकन आणि ऑप्टिमायझेशन हा होता. पीएच.डी. संशोधनासाठी त्यांना डॉ. संदिप आर. पाटील, भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. श्रीमती चारुशीला राणे यांच्या या पीएच.डी. संशोधन आणि पदवी प्राप्तीनंतर समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. वैभववाडी तालुक्यातील ग्रामस्थ व रावराणे समाजातील सर्वांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

You cannot copy content of this page