अवैध वाळू वाहतूक करणारे दोन डंपर मालवण तहसीलदारांनी पकडले 

मालवण तहसीलदार यांची आचरा येथे धडक कारवाई

मालवण ता.२४-:* अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यां 2 डपंरवर मालवण तहसीलदार यांच्या भरारी पथकाने गुरुवारी दुपारी आचरा येथे कारवाई केली. कारवाईत जप्त केलेले सदर डपंर आचरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

मालवण तहसीलदार यांचे भरारी पथक फिरत असताना आचरा मालवण रस्त्यावर हे डपंर विनापास वाळूवाहतुक करताना मालवण तहसीलदार अजय पाटणे यांना आढळुन आले असता ही कारवाई करण्यात आली.

गुरुवारी दुपारी मालवण तहसीलदार अजय पाटणे यांचे भरारी पथक फिरत असताना ही कारवाई करण्यात आली यावेळी त्यांच्या समवेत अव्वल कारकून दिनेश सावंत, तलाठी अनिल काळे, योगेश माळी, कोतवाल गिरीश घाडी कारवाईत सहभागी झाले होते. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास  आचरा मालवण रस्त्यावरून सदर डंपर हे चिंदर तेरई येथून वाळू भरून कणकवलीच्या दिशेने जात असताना हुतात्मा कोयंडे स्मारक समोर आले असता तहसीलदार यांच्या पथकाने सदर डपंर अडवत पासची मागणी केली असता   वाळू वाहतूक करणारे  MH07 X 0597 ,व    MH07 C 6312   हे दोन डंपर विनापास वाळू वाहतूक करत असल्याचे आढळून आले. . सदर डपंरवर मालवण तहसीलदार यांनी कारवाई करून जप्त करत तलाठी यांच्यामार्फत पंचनामा करून आचरा पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत.

You cannot copy content of this page