जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे:आंबोलीतील स्वच्छता मोहिमेच उत्साहात शुभारंभ..
सावंतवाडी : ग्रामपंचायत आंबोली आणि स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी आंबोली येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. स्वच्छतेच्या या वारीमध्ये सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सहभाग घेतला. सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासासाठी स्वच्छता महत्त्वाची असून जबाबदार पर्यटन असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी यावेळी केले केले.
आंबोली घाट मार्गावरील पूर्वीचा वस या देवस्थानच्या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या मोहिमेला सुरुवात झाली. स्वच्छता मिशनचे निमंत्रक गणेश जेठे यांनी या मोहिमेचे प्रास्ताविक करताना सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटन व्यवसाय वाढत असून स्वच्छता आवश्यक आहे. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छ करणे हे स्वच्छता मिशनचे उद्दिष्ट आहे असे स्पष्ट केले.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, स्वच्छता राखणे ही पर्यटकांची देखील जबाबदारी आहे. स्वच्छता जशी स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घेऊन राखली पाहिजे तशी जबाबदारी गावातील नागरिकांची देखील आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लोकसंख्येच्या तिप्पट संख्येने दरवर्षी पर्यटक येतात. त्यामुळे यापुढे जबाबदार पर्यटन याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. स्वच्छतेबरोबरच सुरक्षा देखील महत्त्वाची आहे. आंबोलीतील या स्वच्छता वारीमुळे संपूर्ण जिल्ह्यात आणि गोवा व कर्नाटकामध्ये तसेच पश्चिम महाराष्ट्र मध्ये स्वच्छतेचा संदेश पोहोचणार आहे.
आंबोली ग्रामपंचायतच्या प्रशासक माजी सरपंच सावित्री पालेकर म्हणाल्या, स्वच्छता मिशन ने पुढाकार घेऊन यावेळी आंबोली येथे ही मोहीम राबवली आहे आणि आम्हाला या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल आनंद आहे. आंबोलीमध्ये स्वच्छता ठेवण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करत आहोत पर्यटकांची संख्या वाढते आहे त्यामुळे शासनाकडूनही अपेक्षा आहेत. यावेळी राष्ट्रगीत गाऊन स्वच्छतेचा निश्चय करण्यात आला. आंबोली ग्रामपंचायतीच्या प्रशासक माजी सरपंच श्रीमती सावित्री पालेकर, सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील,वनपाल सम्राट पाटील, गटविकास अधिकारी निलेश जाधव, चौकुल ग्रामपंचायतचे प्रशासक माजी सरपंच गुलाबराव गावडे, पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा, गेळे सरपंच सागर ढोकरे , स्वच्छता विभागाचे श्री. किनळेकर,आंबोली टुरिझम व आंबोली पर्यटन व्यवसायिक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष निर्णय राऊत, पर्यटन व्यवसायिक महासंघाचे कार्याध्यक्ष आदर्श राऊत, निवासी नायब तहसीलदार दिलीप पाटील, स्वच्छता प्रेमी मोहन पडवळ, अनिल मेस्त्री, आनंद परब, संजय सावंत, विजय जामदार,विनायक पाताडे, पोलीस पाटील राणे, मंगेश नेवगी, प्रदीप फोपे, सचिन राणे, उत्तम सावंत, तुषार नेवरेकर, सतीश घाडी, तलाठी नंदकुमार ढेरे, रेस्क्यू टिमचे वामन पालेकर, ग्रामसेवक संदीप गोसावी, ग्रा.पं.स. काशीराम राऊत, शंकर चव्हाण, चौकुळ माजी सरपंच सुरेश शेटवे, सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण गुरव, शंकर गावडे, पोलीस हवालदार संतोष गगोले, लक्षण काळे, सचिन चव्हाण, पोलिस नाईक गौरव परब, वनविभागाचे सम्राट पाटील, तानाजी चव्हाण, वासुदेव खोत, सुधीर काळघे, संकल्प जाधव, अनिकेत देशमुख, बाळा सोमा गावडे, दिव्या थरुडे, संग्राम पाटील, बदाम राठोड, सुरेश कोकरे आदी शेकडो ग्रामस्थ व पर्यटन व्यवसायिक उपस्थित होते. पूर्वीचा वस देवस्थान येथे स्वच्छता मोहीम मोहीम राबवताना स्वतः जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सहभाग घेतला. त्यांनंतर कचरा उचलत स्वच्छतेची ही वारी आंबोली पोलीस चौकी पर्यंत गेली. त्यामुळे आंबोलीतील हा भाग स्वच्छ झाला. अनेक पर्यटकांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हस्ते स्वच्छतेचे आवाहन करणारे पत्रक पर्यटकांना देण्यात आले. शेवटी श्रीमती सावित्री पालेकर यांनी सर्वांचे आभार मानले. या मोहिमेमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच वनविभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने तसेच ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
