वेंगुर्ला
वेंगुर्ला नगरपरिषद प्रशासन तसेच पोलीस प्रशासन यांच्यामार्फत श्री गणेशोत्सव कालावधीत योग्य नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे याबाबतीत चाकरमानी तसेच ग्रामीण भागातील जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.
यावर्षी अनंत चतुर्दशी शुक्रवारी बाराव्या दिनी आल्याने बऱ्याच ठिकाणी गणपती विसर्जन अकराव्या व बाराव्या दिनी होणार असल्याने भक्तगणातून आनंद व्यक्त होत आहे. पाच दिवसांनी गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर शनिवारपासून गेल्या तीन दिवसात वेंगुर्ला एस. टी. आगार मार्फत चाकरमान्यासाठी
बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधी, तसेच राजकीय पदाधिकारी यांच्या मागणीनंतर व आ. दिपक केसरकर यांच्या तातडीच्या पाठपुराव्यानंतर वेंगुर्ला एस टी आगाराला तीन नवीन बसेस प्राप्त झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. उर्वरित दोन बसेस प्राप्त होणार आहेत.
वेंगुर्ला शहरात पोलिसांचे वाहतुकीचे योग्य नियोजन……
