Headlines

जागतिक आयुर्वेद दिनानिमित्त मालवण ग्रामीण रुग्णालयात २३ रोजी आयुष शिबिर

मालवण दि प्रतिनिधी

जागतिक आयुर्वेद दिन व ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ग्रामीण रुग्णालय, मालवण येथील आयुष कक्षाच्या वतीने बुधवार, २३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत मोफत आयुष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये नागरिकांची मोफत आयुर्वेदीय व होमिओपॅथी तपासणी तसेच औषधांचे वितरण करण्यात येणार आहे. संधिवात, सांधेदुखी व गुडघेदुखी, पाठदुखी, मानदुखी, त्वचारोग, खाज, खुजली, एक्झिमा, अम्लपित्त, बद्धकोष्ठता यांसह पचनाच्या तक्रारींवर उपचार व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
तसेच दमा, सर्दी, खोकला यांसारख्या श्वसनविषयक आजारांबाबत तपासणी केली जाणार असून, मधुमेह व उच्च रक्तदाबाबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. याशिवाय स्त्रीरोग व बालरोगासंदर्भातही तज्ज्ञांकडून सल्ला दिला जाणार आहे.

हे शिबिर ग्रामीण रुग्णालय, मालवण येथे होणार असून, तालुक्यातील सर्व नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पोळ यांनी केले आहे.

You cannot copy content of this page