राष्ट्रवादीचा सावंतवाडीत काँग्रेस-शिवसेनेला धक्का…

काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष तर शिवसेनेचे माजी उपशहर प्रमुखांचा प्रवेश; अमित सामंत व अर्चना घारे परब यांच्या उपस्थितीत प्रवेश

सावंतवाडी ता.२५-:आगामी नगरपालिकेच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना आणि काँग्रेस पक्षाला जोरदार धक्का दिला असून, दोन्ही पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत आणि सावंतवाडी विधानसभा अध्यक्षा अर्चना घारे परब यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यावेळी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष काशिनाथ दुभाषी, काँग्रेस पदाधिकारी गणेश निंबाळकर, माजी उपशहरप्रमुख राकेश नेवगी यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला.

You cannot copy content of this page