Headlines

स्वरांजली कार्यक्रमातून लता मंगेशकर, पं. रामदास कामत, कीर्ती शिलेदार यांना आदरांजली

मालवण ता.२४-:* मालवण येथील अष्टपैलू कलानिकेतन आणि भरड येथील दत्त मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वरांजली कार्यक्रमात गानसम्राज्ञी लता मंगेशकर, पं. रामदास कामत, कीर्ती शिलेदार यांना विविध गीतांचे सादरीकरण करत आदरांजली वाहण्यात आली. भरड येथील दत्तमंदिर येथे आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन मालवणी कवी रुजरिओ (बाबला) पिंटो यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नितीन वाळके, भजनसम्राट भालचंद्र…

Read More

एम् अकॅडमी आयोजित क्रिकेट स्पर्धेत कोल्हापूर संघ विजेता

तर सिंधुदुर्ग एम् संघ ठरला उपविजेता; सुधीर आडिवरेकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण सावंतवाडी ता.२४-:* एम् क्रिकेट ऍकॅडमी सावंतवाडीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत कोल्हापूर संघ विजेता तर सिंधुदुर्ग एम् उपविजेता ठरले. माजी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांच्याहस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आल. सहा अंडर १२ च्या टिम यात सहभागी झाल्या होत्या. यात कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग…

Read More

दुर्गंधी व मशिनरीच्या आवाजामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात

माजी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर : एप्रिल महिन्याच्या आत प्रकल्प अन्यत्र हलविण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन सावंतवाडी ता.२४ : नगरपरिषदेच्यावतीने मच्छीमार्केट मध्ये सुरू असलेल्या टाकाऊ मच्छीपासून खत निर्मिती प्रकल्पामुळे दुर्गंधीमुळे व मशिनरीच्या कर्कश आवाजामुळे परिसरातील नागरीकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून याबाबत आज नागरिकांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची भेट घेत व्यथा मांडल्या तर माजी आरोग्य सभापती…

Read More

कोरोना महामारीनंतर तरी विद्यार्थ्यांना शिकू द्या

बहुजन शिक्षक, कर्मचारी महासंघाची शिक्षणाधिकाऱ्यांकडे मागणी कणकवली ता.२४-:* कोरोना महामारीनंतर आता कुठे शाळा नियमितपणे सुरू झाल्या असून शिष्यवृत्ती, नवोदय, डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यासारख्या तत्सम स्पर्धा परीक्षा लगतच्या काळात होऊ घातलेल्या असताना शिक्षक, अंगणवाडीताई, पालकांना प्रशिक्षणासाठी जुंपले जात असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान अटळ आहे. त्यामुळे प्रशिक्षणांच्या सिलसिल्यांबाबत पूनर्रविचार व्हावा अशी मागणी बहुजन शिक्षक,…

Read More

सिंधुवैभव साहित्य समूह , कणकवलीतर्फे 4 एप्रिलला मालवणी कवी संमेलन

कणकवली ता.२४-:* 4 एप्रिल हा दिवस महान कलाकार मच्छिंद्र कांबळी उर्फ बाबूजी यांचा जयंती दिवस असून मालवणी भाषा दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी मालवणी भाषा गौरव करण्याच्या हेतूने सिंधुवैभव साहित्य समूह , कणकवली यांनी मालवणी कवी संमेलन आयोजित केले असून ते दुपारी 4.30 ते 5.30 या वेळात वेदांत इमेजिंग सेंटर , तेली आळी इथे…

Read More

शिरवल फार्मसी कॉलेज येथे २६ रोजी रक्तदान व महिला आरोग्य तपासणी शिबिर

*⚡कणकवली ता.२४-:* कुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिरवल येथील विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार २६ मार्च २०२२ रोजी सकाळी ०९ ते १२ वाजेपर्यंत हे शिबीर घेण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्हा शासकीय रुग्णालय येथील रक्तपेढी विभागाचे आरोग्य अधिकारी कर्मचारी रक्त संकलन करणार आहे. तरी…

Read More

मल्लसम्राट कुस्ती स्पर्धा 17 एप्रिलला

सावंतवाडी ता.२४-:* येथील मल्लसम्राट प्रतिष्ठानतर्फे यंदाची ‘मल्लसम्राट केसरी- 2022’ ही कुस्ती स्पर्धा रविवारी 17 एप्रिलला सावंतवाडीत होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा कुस्ती संघटनेच्या मान्यतेने ही स्पर्धा भरविण्यात येणार आहे. ही स्पर्धा पुरुष व महिलांच्या विविध गटात खेळवली जाणार आहे. स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त कुस्तीपटूंनी सहभागी होण्याचे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे. सहभागासाठी संपर्क- ललित हरमलकर- 9673080812…

Read More

गणित प्राविण्य परीक्षेत प्रतिक्षा नाईक प्रथम

वेंगुर्ला ता.२४-:* महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळामार्फत मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या गणित प्राविण्य परीक्षेचा निकाल जाहिर झाला आहे. यात उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलची विद्यार्थीनी प्रतिक्षा प्रदिप नाईक हिने १०० पैकी ६५ गुण मिळवित वेंगुर्ला तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. कु. प्रतिक्षा हिला मुख्याध्यापक उमेश वाळवेकर, शिक्षिका पल्लवी अंधारी यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल…

Read More

अवकाळी पावसाने दोडामार्ग तालुक्याला काढले झोडपून…

दोडामार्ग ता.२३-:* गेल्या चार पाच दिवसांपासून उकाड्याने नागरीक हैराण झाले आहेत.त्यातच कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेले वादळ यामुळे काही ठिकाणी हवामान खात्याने वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असा इशारा दिला असताना बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आलेल्या अवकाळी वादळी पावसाने पडवे मोरगांव आडाळी कळणे परिसराला झोडपून काढले. पडवे येथे या वादळाचा काजू झाडे आंबा झाडे मोडून…

Read More

साटेली गावातील सात दिवसांच्या शिमगोत्सवाची बुधवारी कळसातील न्हावणाने सांगता

दोडामार्ग ता.२३-:* होळी पौर्णिमेपासून सुरू झालेल्या साटेली गावातील ग्रामदेवता श्री देवी शांतादुर्गा देवी सातेरी देव पुरमार देव चाळोबा देवस्थान यांचा वार्षिक शिमगोत्सवाची बुधवारी सातव्या दिवशी उशिरा कळसातील न्हावणाने सांगता झाली. देवाचे न्हावण घेण्यासाठी गावातील ग्रामस्थ बाहेरील भक्तगण दाखल झाले. होते. मंदिरातील आवरात लांबच लांब रांगा लागल्या होत्या

Read More
You cannot copy content of this page