गणित प्राविण्य परीक्षेत प्रतिक्षा नाईक प्रथम

वेंगुर्ला ता.२४-:* महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळामार्फत मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या गणित प्राविण्य परीक्षेचा निकाल जाहिर झाला आहे. यात उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलची विद्यार्थीनी प्रतिक्षा प्रदिप नाईक हिने १०० पैकी ६५ गुण मिळवित वेंगुर्ला तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

कु. प्रतिक्षा हिला मुख्याध्यापक उमेश वाळवेकर, शिक्षिका पल्लवी अंधारी यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल संस्था चेअरमन विरेंद्र कामत-आडारकर, सचिव रमेश नरसुले व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page