स्वरांजली कार्यक्रमातून लता मंगेशकर, पं. रामदास कामत, कीर्ती शिलेदार यांना आदरांजली

मालवण ता.२४-:* मालवण येथील अष्टपैलू कलानिकेतन आणि भरड येथील दत्त मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वरांजली कार्यक्रमात गानसम्राज्ञी लता मंगेशकर, पं. रामदास कामत, कीर्ती शिलेदार यांना विविध गीतांचे सादरीकरण करत आदरांजली वाहण्यात आली. भरड येथील दत्तमंदिर येथे आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन मालवणी कवी रुजरिओ (बाबला) पिंटो यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी नितीन वाळके, भजनसम्राट भालचंद्र केळुसकर, बाळू काजरेकर आदी उपस्थित होते. सुरवातीस कोरोनाच्या काळात निधन झालेल्या शिवा जाधव, प्रकाश कोरगावकर, आनंद आचरेकर, मयुर मालंडकर, अनिल खडपकर, श्रीनिवास ओरोसकर, शामसुंदर तळगावकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात नांदीने झाली. अॅड. दिलीप ठाकूर, सुनील परुळेकर, प्रफुल्ल रेवंडकर, महेंद्र मराठे यांच्यासह गरिमा काजरेकर, आस्था आचरेकर, सौम्या कुर्ले, कौशिकी काजरेकर, अंकिता परुळेकर, प्रथमेश सामंत, चैताली मेस्त्री, अक्षय परुळेकर यांनी विविध गीते सादर केली. हार्मोनियम-निलेश गवंडी, ऑर्गन बुवा भालचंद्र केळूसकर, तबला सुधीर गोसावी, श्री. पाटील, ध्वनी संयोजन बाळा आचरेकर, सर्वेश परुळेकर यांची साथ लाभली. निवेदन विनोद सातार्डेकर यांनी केले. कार्यक्रमास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

You cannot copy content of this page