एम् अकॅडमी आयोजित क्रिकेट स्पर्धेत कोल्हापूर संघ विजेता

तर सिंधुदुर्ग एम् संघ ठरला उपविजेता; सुधीर आडिवरेकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण

सावंतवाडी ता.२४-:* एम् क्रिकेट ऍकॅडमी सावंतवाडीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत कोल्हापूर संघ विजेता तर सिंधुदुर्ग एम् उपविजेता ठरले. माजी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांच्याहस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आल. सहा अंडर १२ च्या टिम यात सहभागी झाल्या होत्या.

यात कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदि टिमन सहभाग घेतला होता. २५ ओव्हरचे हे सामने झाले. यात कोल्हापूर संघ विजेता तर सिंधुदुर्ग ऐम क्रिकेट संघ उपविजेता ठरला. यावेळी माजी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, माजी पाणी पुरवठा सभापती उदय नाईक, बांदा सरपंच अक्रम खान, राजन नाईक, राहूल रेगे, अमित नाईक, सातोसकर, अरुण घाडी, सावंत आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page