Headlines

मुक्ती की युक्ती ट्रस्टतर्फे आडेली खुंटवळवाडी शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप…

⚡सावंतवाडी ता.२६-: शिक्षण केवळ ज्ञान देत नाही, तर माणुसकी, समता, संस्कार आणि सामाजिक जबाबदारीची जाणीवही निर्माण करते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उत्तम शिक्षणासोबत चांगल्या मूल्यांचा अंगीकार करून आदर्श नागरिक बनावे असे आवाहन मुक्ती की युक्ती ट्रस्टच्या सदस्या सेजल जी यांनी केले.

हरगुरु युगनायक सेठ जी महाराज यांच्या कृपेने मुक्ती की युक्ती ट्रस्टच्यावतीने वेंगुर्ले तालुक्यातील आडेली खुंटवळवाडी येथे जि. प. पूर्ण प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी आयोजित शैक्षणिक साहित्य वितरण प्रसंगी सेजल जी बोलत होत्या. यावेळी ट्रस्टचे स्वयंसेवक संजयजी सीताराम जी, मनीष जी, सुहेला जी, सायली जी आणि सिद्धी जी उपस्थित होत्या.
यावेळी संजयजी सीताराम यांनी परमेश्वर हा कणाकणात प्रत्येक मानवात विराजमान आहे. आणि ते ब्रह्मज्ञान” आणि “आत्मज्ञान “संभव आहे हा पवित्र संदेश हरगुरू युगनायक सेठ महाराज यांनी मानवताला दिला असल्याचे सांगितले. यावेळी मनीष जी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्त्व आणि जीवनातील दैवी मूल्यांची गरज याविषयी विचार मांडले. यावेळी उपस्थित मुक्ती की युक्ती ट्रस्टचे सदस्य व स्वयंसेवक यांच्याहस्ते विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्याचे वितरण करण्यात आले.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका गीता ठाकूर व व इतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मोफत शैक्षणिक साहित्य वितरण अशा उपक्रमांची नितांत आवश्यकता असल्याचे सांगितले. तसेच मुक्ती की युक्ती ट्रस्टच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचे कौतुक करीत शाळेत ट्रस्टचा मोफत शैक्षणिक साहित्य वितरण उपक्रम राबवल्याबद्दल ट्रस्टचे आभार मानले.

You cannot copy content of this page