कणकवली ता.२४-:* 4 एप्रिल हा दिवस महान कलाकार मच्छिंद्र कांबळी उर्फ बाबूजी यांचा जयंती दिवस असून मालवणी भाषा दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी मालवणी भाषा गौरव करण्याच्या हेतूने सिंधुवैभव साहित्य समूह , कणकवली यांनी मालवणी कवी संमेलन आयोजित केले असून ते दुपारी 4.30 ते 5.30 या वेळात वेदांत इमेजिंग सेंटर , तेली आळी इथे पार पडेल.
या कार्यक्रमात प्रसिध्द कवी ‘भोवताल’कार विनय सौदागर यांचे काव्यवाचन व त्यानंतर मालवणी कवींचे सम्मेलन होणार आहे.सम्मेलन अध्यक्ष सुनंदा कांबळे असून गंगाराम गवाणकर यांची प्रमुख उपस्थिती आहे. तरी मालवणी कवींनी मोठ्या संख्येने भाग घ्यावा व आपल्या नावाची नोंद शैलेश घाडी 7798167627, मीनाक्षी चव्हाण 8805645382, सुरेश पवार 9504395085 यांच्याकडे करावी.
