पक्षशिस्त पाळण आवश्यक : अमित सामंत
सावंतवाडी : पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवून राष्ट्रवादीच्या जिल्हा पदावर काम करणाऱ्या तिघा पदाधिकार्यांची हकालपट्टी झाल्याची चर्चा होती. मात्र, असा कोणताही प्रकार घडला नसून कुणाचीही हकालपट्टी करण्यात आली नाही आहे. पक्षासाठी एक एक कार्यकर्ता महत्वाचा असून पक्षशिस्त पाळण आवश्यक आहे. पक्षशिस्त पाळली न गेल्यास कारवाई केली जाते. त्याप्रमाणे पक्षशिस्त पाळण्यासाठी सुचना केली असून कुणाचीही हकालपट्टी करण्यात आलेली नाही असं स्पष्टीकरण जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिल.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते बाबा खतिब, राष्ट्रवादी नेते नजिर शेख, विधानसभा मतदारसंघ अध्यक्षा अर्चना घारे-परब, बाळ कनयाळकर, भास्कर परब, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी आदी उपस्थित होते.
