Headlines

ओसरगाव टोलनाक्यावर भीषण अपघात…

मिनीबसची उभ्या ट्रकला धडक:दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर चालकाला सुरक्षित बाहेर काढले..

⚡कणकवली ता.११-: ओसरगाव टोलनाक्यावर मध्यरात्री १:३०वा. च्या सुमारास मिनीबसने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात मिनीबसच्या चालकाचा पाय वाहनामध्ये अडकला. चालकाचे प्राण वाचवून त्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी घटनास्थळी तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच विविध यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. चालकाचा पाय अडकल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले. सुमारे दीड तासाच्या अथक प्रयत्नांनंतर चालकाला सुरक्षित बाहेर काढण्यात मदत पथकाला यश आले. या मदतकार्यात अक्षय राणे, उदय शिर्के, बबली राणे, संजय हिरलेकर, राजन देसाई, साहिल शंकरदास तसेच वाहतूक पोलीस श्री. झोरे आणि टोलनाक्यावर उपस्थित असलेल्या नागरिकांनी महत्त्वपूर्ण मदत केली. सर्वांच्या प्रयत्नांमुळे चालकाचे प्राण वाचवण्यात यश आले.

चालकाला सुरक्षित बाहेर काढल्यानंतर पुढील उपचारासाठी ओरोस येथील रुग्णालयात पाठवण्यात आले. मध्यरात्रीच्या या अपघातामुळे काही काळ टोलनाक्यावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र उपस्थित नागरिक, पोलीस आणि मदत यंत्रणांनी तत्परतेने केलेल्या मदतकार्यामुळे चालकाला वेळेत बाहेर काढण्यात आले.

You cannot copy content of this page