Headlines

वेंगुर्ला नगरपरिषदमार्फत‘हर घर तिरंगा’ अभियांतर्गत 11 ऑगस्ट पासून उपक्रम…..

श्री. दिलीप गिरप ; गुरुवार दि. १३ ऑगस्ट रोजी शहरात भव्य “तिरंगा रॅली”.

वेंगुर्ला
शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांच्या निर्देशानुसार वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत मंगळवार दि. ११ ते शनिवार दि. १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विविध देशभक्तीपर, सामाजिक व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत नागरिक, विद्यार्थी, शाळा व महाविद्यालयांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन वेंगुर्ला नगरपरिषद नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी केले आहे.
मंगळवार दि. ११ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० वा. मांडवी परिसर येथे स्वच्छता मोहिम आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी स्वच्छता निरीक्षक प्रविण कांबळे यांच्याशी संपर्क साधावा. बुधवार दि. १२ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वा. वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला येथून सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये ई-बाईक सहसुद्धा सहभागी होता येणार आहे. या उपक्रमासाठी नगर अभियंता विशाल होडावडेकर यांच्याशी संपर्क साधावा. गुरुवार दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वा. वेंगुर्ला नगरपरिषद येथून
तिरंगा रॅली चे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये नागरिक, विद्यार्थी, युवक-युवती, विविध संस्था व संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. याच दिवशी दुपारी २.३० वाजता ‘तिरंगा प्रश्नमंजुषा’ आयोजित करण्यात आली आहे. प्रश्नमंजुषेसाठी स्थापत्य अभियंता गणेश कांबळे यांच्याशी संपर्क साधावा. शुक्रवार दि. १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वा.
वेंगुर्ला नगरपरिषद येथे फाळणी भयावहता स्मृती दिन आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी लिपिक मंदार चौकेकर यांच्याशी संपर्क साधावा. तसेच नाटककार मधुसूदन कालेलकर नाट्यगृह येथे सकाळी 10 वा. रांगोळी स्पर्धा (महिलांसाठी ) आयोजित करण्यात आली असून त्यासाठी विलास ठुम्बरे यांच्याशी संपर्क साधावा. शनिवार
दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा.
वेंगुर्ला नगरपरिषद येथे ‘तिरंगा’ सांस्कृतिक कार्यक्रम व ‘वंदे मातरम्’ गीतगायन आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी स्थापत्य अभियंता गणेश कांबळे यांच्याशी संपर्क साधावा.
‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून देशभक्तीची भावना वृद्धिंगत करणे, राष्ट्रीय ध्वजाबद्दल आदर निर्माण करणे तसेच नागरिकांमध्ये स्वच्छता, एकता व राष्ट्रीय अभिमानाची भावना दृढ करणे, हा या विविध उपक्रमांचा उद्देश आहे.
वेंगुर्ला शहरातील नागरिक, शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, शिक्षक, विविध संस्था व संघटनांनी या सर्व उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन ‘हर घर तिरंगा’ अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन वेंगुर्ला नगरपरिषद नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी व सर्व नगरसेवक यांच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page