Headlines

हनुमान जन्मोत्सव सोहळा भक्तीमय वातावरणात साजरा

जल्लोष २०२२ धमाकेदार कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद कणकवली ता.१६-:*शकणकवली शहरातील कांबळे गल्ली येथील बाळ गोपाळ हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळा भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.या उत्सवानिमित्त सकाळपासून भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.तसेच मंदिर परिसरात मंडप,मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई तसेच मंदिर परिसरात रांगोळी घालून आकर्षक…

Read More

सावंतवाडीत हनुमान जयंती उत्साहात साजरी

सावंतवाडी ता.१६-:शहरातील हनुमान मंदिरात आज हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. यावेळी कोरोना नंतर तब्बल दोन वर्षांनी शहरातील सर्वच हनुमान मंदीरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी शहरातील प्रसिद्ध असलेल्या नरेंद्र डोंगर येथील हनुमान मंदीरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती

Read More

फोंडाघाट महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम

कणकवली ता.१६-:* कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम संपन्न झाला. या निमित्ताने महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विद्यार्थी विषयक विचार या विषयावर निबंध स्पर्धा तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर: एक सामाजिक चळवळ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.      या कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. संतोष रायबोले यांनी महात्मा फुले,…

Read More

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ मालवणच्या ‘अखिल्स हेल्प डेस्क’चे उद्घाटन

मालवण ता.१६-:* दिवसेंदिवस बदलत जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाला सर्व शिक्षकांना समर्थपणे तोंड देता यावे यासाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, शाखा मालवण या संघटनेने एक अभिनव उपक्रम सुरु केला आहे. संघटनेतील तंत्रस्नेही शिक्षक राजेश भिरवंडेकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या व अमर वाघमारे आणि परशुराम गुरव यांच्या नेतृत्वाखाली ‘अखिल्स हेल्प डेस्कची’ निर्मिती करण्यात आली असून त्याची सुरुवात…

Read More

साळेल येथे २८ रोजी रक्तदान शिबीर

मालवण ता.१६-:* सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि आचरेकर परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार सिद्धू आचरेकर यांची सुकन्या ज्ञानदा हिच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त गुरुवार दि. २८ एप्रिल रोजी साळेल येथील पवार बंगला येथे सकाळी ९ ते दुपारी १ वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान करण्यासाठी इच्छूक रक्तदात्यांनी सिद्धू आचरेकर 8275649254, दत्ता पिंगुळकर, आरोग्य सेवक- 9403640431,…

Read More

कांदळगाव ओझर विद्यामंदिर हीरक महोत्सव २३ रोजी

मालवण ता.१६-:* मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समिती संचलित ओझर विद्यामंदिर, कांदळगावचा हीरकमहोत्सवी सोहळा दि. २३ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी उद्घाटक म्हणून खासदार विनायक राऊत, स्वागताध्यक्ष म्हणून मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, प्रमुख पाहुणे म्हणून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, उद्योजक डॉ. दीपक…

Read More

सामाजिक समता सप्ताहानिमित्त समाजमंदिर येथे स्वच्छता मोहिम

मालवण ता.१६-:* सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागअंतर्गत सामाजिक समता सप्ताहानिमित्त समाजकल्याण सिंधुदुर्ग, मालवण नगरपरिषद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह व बार्टी यांच्यावतीने मालवण एसटी स्टँड येथील समाजमंदिर येथे स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी वसगीगृहाचे गृहपाल के. एस. इंदलकर, संग्राम कासले, कर्मचारी सिद्धीविनायक चिपकर, मयुर कदम, अमित जाधव, मयुरेश सावंत, नगरपरिषद कर्मचारी विश्राम…

Read More

राजस्तरीय गीत गायन स्पर्धेत बांदेकर माता – पुत्राचे सुयश…

सावंतवाडी ता.१६-:* कोल्हापूर येथील शिवाजी भोसले प्रतिष्ठान आयोजित, राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धेमध्ये बांदा केंद्र शाळा नंबर एक मधील इयत्ता तिसरी मध्ये शिकणारा विद्यार्थी कु.नील नितीन बांदेकर याने बाल गटातून द्वितीय क्रमांक तसेच त्याची आई गौरी नितीन बांदेकर यांनी खुल्या गटातून तृतीय क्रमांक पटकावला आहे. या मायलेकराच्या जोडीने यापूर्वीही अनेक स्पर्धांमध्ये बरीच बक्षिसे पटकावली आहेत. त्यांच्या…

Read More

सेवानिवृत्त सेवक संघाची २४ रोजी सभा

मालवण ता.१६-:* मालवण तालुका सेवानिवृत्त सेवक संघाची कार्यकारिणीची सभा रविवार दि. २४ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता हॉटेल लीलांजली, भरड मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी कार्यकारिणीच्या सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष मंगेश शेर्लेकर व सचिव दामोदर गवई यांनी केल आहे.

Read More

खारेपाटण येथे हनुमान जन्मोस्तोव सोहळा

कणकवली ता.१६-:* खारेपाटण हनुमान नगर – कोष्टयेवाडी येथील हनुमान मंदिर येथे हनुमान मित्र मंडळ खारेपाटणच्यावतीने हनुमान जन्मोस्तव सोहळा साजरा करण्यात आला. हनुमान जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त खारेपाटण येथील हनुमान मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.तर हनुमान मंदिर ला विदुयत रोषणाईने सजविण्यात आले होते. हनुमान जयंती निमित्त सकाळी ६.३० वाजता…

Read More
You cannot copy content of this page