जल्लोष २०२२ धमाकेदार कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
कणकवली ता.१६-:*शकणकवली शहरातील कांबळे गल्ली येथील बाळ गोपाळ हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळा भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.या उत्सवानिमित्त सकाळपासून भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.तसेच मंदिर परिसरात मंडप,मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई तसेच मंदिर परिसरात रांगोळी घालून आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती.
सकाळी ६. ३० वा . हनुमान जन्मोत्सव पार पडला . दुपारी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.त्यानंतर श्री सत्यनारायणाची महापूजा पार पडली.सायंकाळी ५ वा . आरती व भजने झाली . रात्री ८.३० वा . बाळगोपाळ हनुमान मित्रमंडळे कांबळेगल्ली व कणकवलीतील स्थानिक कलाकारांचा जल्लोष २०२२ हा धमाकेदार सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.यामध्ये स्थानिक कलाकारांनी नृत्य सादर करत रंगत आणली तसेच विविध वेशभूषा सहित केलेल्या नाट्य कलागुणांना रसिक प्रेक्षाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी बाल गोपाळ हनुमान मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
