मालवण ता.१६-:* सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागअंतर्गत सामाजिक समता सप्ताहानिमित्त समाजकल्याण सिंधुदुर्ग, मालवण नगरपरिषद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह व बार्टी यांच्यावतीने मालवण एसटी स्टँड येथील समाजमंदिर येथे स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
यावेळी वसगीगृहाचे गृहपाल के. एस. इंदलकर, संग्राम कासले, कर्मचारी सिद्धीविनायक चिपकर, मयुर कदम, अमित जाधव, मयुरेश सावंत, नगरपरिषद कर्मचारी विश्राम जाधव, मिथुन शिगले, नरेश वायंगणकर, सुनिल देऊलकर, हेमंत वायंगणकर, आदि उपस्थित होते.
यावेळी साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊसाठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत मालवण एसटी स्टँड ते दलितवस्ती रस्ता रूंदीकरण व पेव्हर ब्लॉक व क्रांक्रिटीकरण करणे या विकासकामाचा लाभ घेतलेल्या नागारिकांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या. समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त दिपक घाटे यांच्या मागदर्शनाखाली सदरचा कार्यक्रम राबविण्यात आला.
