मालवण ता.१६-:* मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समिती संचलित ओझर विद्यामंदिर, कांदळगावचा हीरकमहोत्सवी सोहळा दि. २३ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता साजरा होणार आहे.
या सोहळ्यासाठी उद्घाटक म्हणून खासदार विनायक राऊत, स्वागताध्यक्ष म्हणून मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, प्रमुख पाहुणे म्हणून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, उद्योजक डॉ. दीपक परब, कांदळगाव सरपंच उमदी परब उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त २३ रोजी सायंकाळी ७ वा. पालक, आजी-माजी विद्यार्थी, पंचक्रोशीतील प्राथमिक शाळा यांचा विविध गुणदर्शनपर कार्यक्रम आणि माजी विद्यार्थ्यांचा दशावतारी नाट्यप्रयोग ‘गदापर्व.’ २४ रोजी सायंकाळी ६.३० वा. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थ्यांचा नृत्य आणि गाण्यांचा बहारदार ऑर्केस्ट्रा ‘ओझर’ आदी कार्यक्रम होणार आहेत.
