कणकवली ता.१६-:* खारेपाटण हनुमान नगर – कोष्टयेवाडी येथील हनुमान मंदिर येथे हनुमान मित्र मंडळ खारेपाटणच्यावतीने हनुमान जन्मोस्तव सोहळा साजरा करण्यात आला. हनुमान जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त खारेपाटण येथील हनुमान मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.तर हनुमान मंदिर ला विदुयत रोषणाईने सजविण्यात आले होते.
हनुमान जयंती निमित्त सकाळी ६.३० वाजता हनुमान जन्मसोहळा साजरा करण्यात आला.त्यानंतर अभिषेक व आरती करण्यात आली.दुपारी १ ते ३ च्या दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.खारेपाटण मधील सर्व नागरिकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.सायंकाळी ६ ते ४ या वेळात स्थानिक महिला मंडळाच्या सुश्राव्य भजनाने वातावरण भक्तिमय झाले होते.रात्रौ ८ ते ११ या वेळात वारकरी दिंडी भजने सादर करण्यात आली.
हनुमान मित्र मंडळाचे कार्यकर्ते महेश कोळसुलकर,श्याम कोळसुलकर,राजन कोळसुलकर, नाना कोळसुलकर,संदेश कोळसुलकर, प्रकाश नानिवडेकर, भुषण कोळसुलकर,तुषार कोळसुलकर,संजय कोळसुलकर, संदेश तेली,आदी कार्यकर्त्यानी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. तर या कार्यक्रमाला झुंझार मित्र मंडळाचे कार्यकर्ते संकेत शेट्ये,खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे,खारेपाटण सोसायटीचे संचालक भाऊ राणे ,सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
