कणकवली ता.१६-:* राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, मुंबई विद्यापीठ यांच्याकडून मिळालेल्या सूचनेनुसार जिल्ह्यातील खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कक्ष व आजीवन अध्ययन व विस्तार विभाग व शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाची सुरूवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए डी कांबळे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
शेठ नवीनचंद्र मफतलाल संगीत विभागाचे संगीत शिक्षक संदिप पेंडुरकर यांनी ज्याने हा धर्म ऐसा… ज्याने दिला हा प्राण… बा भिमराया शिल्पकार तू… तसेच प्रा.अजय गुरसाळे यांनी कायदा भिमाचा बोल असलेले गीत गायले. वरिष्ठ महाविद्यालयातील प्रथम वर्ष विद्यार्थी कु.श्रुती पाटणकर यांनी किती भिमाच्या सांगाव्या कथा… व विनायक बंदरकर यांनी राजा राणीच्या जोडीला… असे बोल असलेले गीत गायले.शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालयातील 6वी वर्गातील प्राजक्ता ठाकूरदेसाई यांनी कुंकु लाविलं रमानं.. असे बोल असलेले गीत गायले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आत्माराम कांबळे यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक राजेश वारंगे यांनी स्विकारले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे 64 विषयात मास्टर्स होते आणि त्यांना 11 भाषां लिहिता वाचता आणि बोलता येत होत्या. ते भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि दलित नेते होते. ज्यांच्यामुळे लाखों घरांचा उद्धार झाला, दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला अशा महामानवाचे चरित्र आजच्या आधुनिक पिढीने वाचून आपले स्थान निर्माण करावे असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आत्माराम कांबळे यांनी केले.
या प्रसंगी खारेपाटण पंचक्रोशीत शिक्षण प्रसारक मंडळ, खारेपाटणचे संचालक राजेश वारंगे, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक तथा महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी वसीम सय्यद, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग विस्तार अधिकारी प्रा.प्रकाश शिंदे, प्रा.मानसी कुलकर्णी, प्रा.प्रतिक नाटेकर, शेठ नवीनच॔द्र मफतलाल विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक संजय सानप, श्री.दयानंद कोकाटे, महेंद्र चिंगळे, अजय गुरसाळे आदी प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना कक्ष विद्यार्थी प्रतिनिधी कु.निलम पांचाळ व कु.सिध्देश सावंत आदी राष्ट्रीय सेवा योजना कक्ष स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सक्रीय सहभाग दर्शविला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरज राणे, आभार प्रदर्शन संजय सानप यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव मोठे यांनी केले.
