सबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी येत नाहीत तो पर्यंत काम सुरू करू देणार नाही; ग्रामस्थांचा इशारा
बांदा ता.१६-:* बांदा परिसरात गॅस पाईप लाईन साठी जमीन खोदाइचे काम जोरदार सुरू असून, आज डेगवे गावातून बांदा सीमेवर पानवळ भागात रस्त्याच्या बाजूला सुरू असलेले खोदाईचे काम स्थानिक ग्रामस्थांनी आज बंद पाडले आहे. हा रस्ता दुरुस्त होण्यासाठी गेली ६ वर्ष येथील ग्रामस्थांनी उपोषण, मुंडण, आंदोलने केली होती.
त्यानंतर काहीच दिवसांपूर्वी या रस्त्याचे काम करण्यात आले असून, एक महिना देखील झालेला नसताना आणि पावसाळा तोंडावर असताना रस्त्याच्या शेजारी होणारी ही खोदाईमुळे सर्वमान्य जनतेचे हाल होणार असून, तसा प्रयत्न कंपनीचे कंत्राटदार आणि मुकादम करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यावेळी जो पर्यंत ज्या विभागातून या कामास परवानगी देण्यात आली आहे. त्या विभागाचे वरिष्ठ अधिकारी तेथे येत नाहीत तो पर्यंत या भागात काम करू देणार नाही असा ग्रामस्थांनी दिला आहे. यावेळी ज्ञानेश्वर सावंत, बाबा गाड, अक्रम खान, बाळू मोर्ये, आनंद सावंत, पापू कदम आदी उपस्थित होते.
