परशुराम उपरकर; आठ दिवसात कारवाई न केल्यास तहसीलदार हटाव मोहिम
सावंतवाडी ता.१६-:* आपल्या अधिकाराचा गैरवापर करून तालुक्यात मोठ्या प्रमाणात जमिन घोटाळे सावंतवाडी तहसीलदार यांनी केले असून, याबाबत अनेकांनी लेखी स्वरूपातील पुरावे आपल्याकडे सादर केले असून, या सगळ्या प्रकारात उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी, सावंतवाडीचे तत्कालीन प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, व नायब तहसिलदार यांचाही हात असल्याचा खळबळजनक आरोप मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.
यावेळी ते पुढे म्हणाले की, नागरिकांची फसवणूक करणाऱ्या या सगळ्याची तक्रार आपण लोकायुक्तांकडे करणार असून, त्यांच्यावर येत्या आठ दिवसात कारवाई न झाल्यास मनसे तहसीलदार हटाव मोहीम हाती घेणार असल्याचा इशारा परशुराम उपरकर यांनी यावेळी दिला आहे.
यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार, संतोष भैरवकर, संदेश शेट्ये, उप तालुकाध्यक्ष प्रकाश साटेलकर, बांदा शहराध्यक्ष बाळा बहिरे, डिंगणे ग्रा. प. सदस्य आदेश सावंत, विश्वनाथ राऊळ, आदी उपस्थित होते.
