Headlines

बुर्डी पुलावर रिक्षा-आयशरची भीषण धडक…

वृद्ध प्रवासी गंभीर जखमी..

सावंतवाडी : सावंतवाडी-आंबोली मार्गावरील बुर्डी पुलावर आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रिक्षा आणि आयशर टेम्पो यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात आंबोली येथील गणपत राऊळ (वय ६५) हे गंभीर जखमी झाले आहेत.

सकाळी दहाच्या सुमारास बुर्डी पूल परिसरात रिक्षा आणि आयशर टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की त्यात रिक्षातील वृद्ध प्रवासी गणपत राऊळ हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सोहम हिरलेकर आणि शिवम हिर्लेकर यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. हिर्लेकर यांनी कोणताही विलंब न लावता तत्परता दाखवत जखमी गणपत राऊळ यांना तातडीने सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या रुग्णालयात त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे जखमी वृद्धावर वेळीच उपचार सुरू होऊ शकले. याबाबतची माहिती सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रवी जाधव यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page