दोडामार्ग :
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, दोडामार्ग शाखेची बैठक उत्साहात पार पडली. बैठकीत संघटन बळकटीकरण, आगामी उपक्रम, पक्षविस्तार तसेच जनसामान्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवून युवकांना संघटनेशी जोडण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
बैठकीस श्री. विनायक कृष्णा सावंत, श्री. संदीप नामदेव गावडे, श्री. मधुसूदन (दादा) खांबल, श्री. पांडुरंग निरंजन जाधव, श्री. महेश भागोजी वरक, श्री. सतीश पांडुरंग सावंत, श्री. जयेंद्र कृष्णा गावडे तसेच श्री. नितीन शिवाजी गावकर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी संघटन अधिक सक्षम करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. आगामी काळात सामाजिक उपक्रम, जनहिताचे प्रश्न आणि पक्ष संघटन वाढीसाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.
