Headlines

लोकसहभागातून असनिये शाळेला नवे किचन शेड…

ग्रामस्थांनी घालून दिला प्रशासनासमोर आदर्श..

⚡बांदा ता.२५-:
शासनाच्या मर्यादित आर्थिक मदतीची वाट न पाहता असनिये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पालक, ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीने लोकसहभागाच्या बळावर सुमारे दोन लाख रुपये खर्चून नवीन किचन शेड उभारून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. वस्तुरूप देणगी, श्रमदान आणि आर्थिक सहकार्याच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या किचन शेडचे उद्घाटन शुक्रवारी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गुरुप्रसाद दामले यांच्या हस्ते झाले.
यावेळी समिती उपाध्यक्ष लक्ष्मी गणपत सावंत, पोलिस पाटील विनायक कोळपटे, ग्रामपंचायत सदस्य भरत सावंत, पालक संजय सावंत, धनश्री सावंत, पांडुरंग सावंत, सतीश सावंत, मुख्याध्यापक सुनील गवस, शिक्षिका स्वाती गवस तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शासनाकडून पूर्वी उभारण्यात आलेले फॅब्रिकेटेड किचन शेड जीर्ण व नादुरुस्त झाल्याने विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजन व्यवस्थेवर परिणाम होत होता. ही अडचण ओळखून ग्रामस्थांनी पुढाकार घेत अवघ्या काही दिवसांत नवीन किचन शेड उभारले. या कामासाठी गुरुप्रसाद दामले, लक्ष्मण राघोबा सावंत, भरत सावंत, पांडुरंग सावंत, संजय सावंत, बुधाजी सावंत, अनिल सावंत, श्रीधर सावंत, विनायक कोळपटे, धनश्री सावंत, बाळकृष्ण सावंत आणि बाळकृष्ण मेस्त्री यांचे विशेष योगदान लाभले. लोकसहभागातून उभा राहिलेला हा उपक्रम प्रशासनासह इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

फोटो——-
असनिये : किचन शेडचे उद्घाटन करताना गुरुप्रसाद दामले. सोबत पालक, ग्रामस्थ व शिक्षक.

You cannot copy content of this page