Headlines

​इन्सुली येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिर उत्साहात संपन्न…

​आमदार दीपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम; ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद..

⚡बांदा ता.२५-:
सावंतवाडीचे धडाडीचे नेतृत्व शिवसेना तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांच्या वतीने माजी मंत्री तथा विद्यमान आमदार दीपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इन्सुली येथे मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
​नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती सुस्मिता जाधव यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून व धन्वंतरीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली.
​या प्रसंगी माजी सभापती विनायक दळवी, इन्सुलीचे सरपंच तात्या वेंगुर्लेकर, इन्सुली पंचायत समिती सदस्य सदा राणे, इन्सुली व्हीलेज विकास सोसायटीचे माजी चेअरमन रामचंद्र चराटकर, राजन परब , शिवसेना पक्षाचे उपाध्यक्ष झेवियर फर्नांडिस, विभाग प्रमुख मंगलदास देसाई, प्रवीण राणे, विजय डूगल, आपा आमडोस्कर, नाना पेडणेकर, शिवा सावंत, संजय राणे, बापू कोठावळे, गुरु शेट्ये, बंड्या हळदणकर, दिनेश मुळीक, महेश गावकर आदी मान्यवर व सावंतवाडी तालुक्यातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​या शिबिरासाठी जिल्ह्यातील नामांकित नेत्र तपासणी तज्ञ डॉक्टरांची टीम तसेच इन्सुली प्राथमिक आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्री. भाग्यवंत, सौ. दीपा देसाई व दिपाली खडपकर यांच्या संपूर्ण टीमचे मोलाचे सहकार्य लाभले.
​सकाळी ९:३० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत चाललेल्या या शिबिराचा इन्सुली गावातील शेकडो ग्रामस्थांनी व महिलांनी उत्स्फूर्तपणे लाभ घेतला. उपस्थित सर्व मान्यवरांनी व ग्रामस्थांनी या सामाजिक उपक्रमाचे विशेष कौतुक केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन नारायण उर्फ बबन राणे मित्र मंडळ’ तर्फे अत्यंत उत्कृष्टपणे करण्यात आले. यावेळी चारशे हुन अधिक जणांनी शिबिराचा लाभ घेतला.

You cannot copy content of this page