Headlines

आषाढी एकादशीनिमित्त भाजप युवा नेते विशाल परब यांनी घेतले विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन…

⚡सावंतवाडी: आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर सावंतवाडी शहर व परिसरात सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून ‘विठू माऊली’ आणि ‘जय श्री राम’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. या औचित्यावर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र युवा नेते श्री. विशाल परब यांनी सावंतवाडीमधील विविध विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांना भेट देऊन श्री विठ्ठल आणि माऊली रुक्मिणीचे भाविकतेने दर्शन घेतले.

दर्शन घेतल्यानंतर श्री. विशाल परब यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधत सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी नागरिक आणि भाविक पांडुरंगाच्या नामघोषात तल्लीन होऊन मोठ्या उत्साहाने सोहळ्यात सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page