वैभववाडी प्रतिनिधी
या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला नामाच्या गजरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्या मंदिर नावळे धनगरवाडा शाळेतली विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या वतीने नावळे गावात भक्ती मळा फुलवला.
आषाढी वारी निमित्ताने नारळे गावात विद्या मंदिर नावळे धनगरवाडा शाळेचे विद्यार्थी शिक्षक व ग्रामस्थ यांनी विठुरायाच्या गजरात शाळा ते भगवती मंदिर अशी पारंपारिक वेशभूषा करून दिंडी काढण्यात आली या दिंडीमुळे संपूर्ण गावात भक्तीचा मळा फुलला होता विद्यार्थी सह ग्रामस्थ विठुरायाच्या गजरात दंग होऊन दिंडीत नाचत होते या दिंडीत महिलांचा मोठा सहभाग होता यावेळी सरपंच सोनल गुरव तंटामुक्ती अध्यक्ष संजय शेळके माजी तंटामुक्ती अध्यक्ष भजनी बुवा रमेश गुरव ग्रामविकास अधिकारी संभाजी वाघमोडे, संजय पाटील माजी मुख्याध्यापक संतोष भरडकर मुख्याध्यापक जयकुमार माने, ग्रामपंचायत सदस्य रश्मी गुरव शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र सावंत वर्ष हटकर प्रियांका पिसे, विश्वनाथ घाडी दाखला गुरव वसंत गुरव आत्माराम गुरव अंगणवाडी सेविका नरम मॅडम, साक्षी गुरव नेहा गुरव लक्ष्मी गुरव जगन्नाथ गुरव आदी ग्रामस्थ उपस्थित होते. शाळा व्यवस्था समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र सावंत यांच्या घरी दिंडीला फराळ दिल्यानंतर दिंडीची सांगता करण्यात आली.
विद्या मंदिर नावळे धनगरवाडा शाळेच्या विद्यार्थ्यांची पारंपरिक दिंडी उत्साहात…
