Headlines

एसटी कर्मचाऱ्यानी विलिनीकरणाचा भूलभुलैया विसरून कामावर रुजू व्हावे:मोहन केळुसकर

कणकवली ता.१५-:* एसटी कर्मचाऱ्याचे स्वंयम घोषित नेते अॕड. गुणरत्न सदावर्ते यांनी कर्मचार्यांची दिशाभूल करुन एसटीचा संप साडेपाच महिने चिघळवून ठेवला. आता त्यांची न्यायालयीन फरफट उभा देश अनुभवतो आहे. कर्मचार्यांनी आता झाले गेले ते दु:स्वप्न विसरून जावे. राज्यातील प्रवाशाची जीवनवाहिनी असलेली एसटी जगली पाहिजे आणि कर्मचार्यांचे कुटुंबही जगले पाहिजे. भाजप पक्षाचे धोरण हे खाजगीकरणाच्या दिशेने चालले…

Read More

महाराष्ट्राची परंपरा असलेल्या वारकरी दिंडीला धोंडू चिंदरकर यांच्यामुळे व्यासपीठ

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली; केंद्रीयमंत्री नारायण राणे वाढदिवस निमित्त आयोजित केली दिंडी भजन नृत्य स्पर्धा मालवण ता.१५-:* वारकरी दिंडी नृत्य ही महाराष्ट्राची परंपरा आहे. ही परंपरा जोपासणाऱ्या कलाकारांना एक मोठे व्यासपीठ मिळवून देण्याच्या हेतूने भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर व सहकारी यांच्या संकल्पनेतुन आयोजित करण्यात आलेली दिंडी भजन नृत्य स्पर्धा खऱ्या अर्थाने लक्षवेधी ठरली आहे. केंद्रीय…

Read More

कणकवली बाल गोपाळ हनुमान मंदिरात उद्या हनुमान जन्मोत्सव

विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन कणकवली ता.१५-:* कणकवली येथील बाल गोपाळ हनुमान मंदिर कांबळे गल्ली येथे प्रतिवर्षाप्रमाणे शनिवार 16 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव साजरा होणार आहे.या जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम – सकाळी 6.30 वा.हनुमान जन्म,तीर्थ प्रसाद,दुपारी 1.00वा.आरती व महाप्रसाद,दुपारी 3.00 वा.श्री सत्यनारायणाची महापूजा सायंकाळी 5.00 वा.आरती सायंकाळी…

Read More

श्रीकृष्ण मंदिरातील जुन्या मूर्तीचे विसर्जन

मालवण ता.१५-:* मालवण धुरीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण मूर्तीची पुनः प्राण प्रतिष्ठापना करण्यात आल्यावर आज शुक्रवारी जुन्या मूर्तीचे वाजतगाजत आणि हरी नामाच्या जयघोषात मालवण चिवला बीच येथील समुद्रात विसर्जन करण्यात आले. मालवण धुरीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण मूर्तीची पुनः प्राण प्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा दिमाखात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी मंदिरातील श्रीकृष्णाच्या जुन्या मूर्तीच्या…

Read More

अखेर पंचशील नगर परिसरातील विकास कामांचा शुभारंभ…

सेवानिवृत्त सहा.पोलिस निरीक्षक विजय कदम यांनी केला पाठपुरावा देवगड ता.१५-:* देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील देवगड किल्ला पंचशील नगर याठिकाणी संपूर्ण पंचशील नगर परिसरातील गल्लीबोळात बंदिस्त गटार व त्यावर सिमेंट काँक्रीट रोड तयार करणे याबाबतची मागणी केली वर्षभर होत होती. परंतु या कामाचा पाठपुरावा करून मंजुरी मिळवणे या कामाचा शुभारंभ करण्यात आला नव्हता. सेवानिवृत्त सहा. पोलीस…

Read More

तरुण युवकांनी मंडळाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन मंडळाची धुरा पुढे चालवावी…

भंडारी समाज जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर यांचे आवाहन सावंतवाडी ता.१५-:* येथील तालुका भंडारी मंडळाच्या माध्यमातून वर्षभरात अनेक वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात याची प्रेरणा घेऊन सर्व तालुके आता सक्रिय झाले आहेत.मात्र कार्यक्रमात तरुण मंडळींचा सहभाग हवा तसा दिसून येत नाही याची थोडी खंत आहे. तरुण मंडळींनी आपल्याच ह्या मंडळाच्या कार्यक्रमात सहभागी होत या मंडळाची धुरा पुढे…

Read More

काळसे येथे बीएसएनएल टॉवरचे उद्घाटन तर संरक्षक भिंतीचे भूमिपूजन

खा.विनायक राऊत,आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून विकास कामे मालवण ता.१५-:* मोबाईल रेंज ची समस्या असलेल्या काळसे गावात खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून बी.एस.एन.एल. मोबाईल टॉवर उभारण्यात आला असून आज या टॉवरचे उद्घाटन खासदार विनायक राऊत, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.त्यामुळे गावातील रेंज ची समस्या आता दूर झाली आहे.तसेच आमदार वैभव…

Read More

युनिकच्या सलग ८ ते १८ तास अभ्यास उपक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली ता.१५-:* कठोर मेहनत,शिस्त, संयम आणि सातत्य ठेवून आपल्या जिल्ह्यातील मुलांनी अभ्यास करावा यश नक्की मिळेल असे प्रशासकीय अधिकारी गितांजली नाईक यांनी केले आवाहन युनिक अकॅडमी कणकवलीचा सलग ८ ते १८ तास अभ्यास उपक्रम प्रसंगी प्रशाकीय अधिकारी गितांजली नाईक यांनी केले. १४ एप्रिल.. बाबासाहेब डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून, विद्यार्थीदशेतील त्यावेळच्या परिस्थितीला…

Read More

नांदगाव सोसा.चे किंगमेकर गौरीशंकर खोत यांचे आ. वैभव नाईक यांनी केले अभिनंदन

कणकवली ता.१५-:* नांदगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूकिमध्ये शिवसेना पुरस्कृत बळीराजा पॅनेलने १३ पैकी १३ जागांवर एकतर्फी विजय मिळवला. शिवसेना लोकसभा संपर्कप्रमुख गौरीशंकर खोत हे या निवडणुकीचे किंगमेकर ठरले असून कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी गौरीशंकर खोत यांच्या नांदगाव येथील निवासस्थानी भेट देत पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी पंढरी पारकर,माजी चेअरमन…

Read More

महाराष्ट्र दिनी मनसे कडून रक्तदान शिबिराचे आयोजन…

सावंतवाडी ता.१५-:* महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने १ मे महाराष्ट्र दिन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे मळगाव इंग्लिश स्कूल येथे सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत हे शिबीर पार पडणार असून आपली जबाबदारी म्हणून नक्कीच रक्तदान करण्याची आर्त हाक सुधीर राऊळ यांनी दिली आहे. तर या शिबिराच्या नाव नोंदणीसाठी राकेश परब व विजय बुगडे…

Read More
You cannot copy content of this page