Headlines

सेवांगणच्या विविध स्पर्धांचा निकाल जाहीर

मालवण ता.१५-:* मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे नर्सिंग असिस्टंट आणि शिवणकला वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या दोन्ही वर्गातील विद्यार्थिनींसाठी कथाकथन, गीतगायन आणि संगीतखुर्ची स्पर्धेचे आयोजन सेवांगणने केले होते. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे- गीतगायन स्पर्धा- प्रथम सुगंधी कांदळगावकर, द्वितीय- मिताली कांबळी, तृतीय सोनाली कांबळी, कथाकथन स्पर्धा- प्रथम-गौरी मेस्त्री, द्वितीय -ऐश्वर्या मंचेकर, संगीतखुर्ची प्रथम ममता लुडबे,…

Read More

टीचर टॉक फोरमची दोडामार्ग तालुका कार्यकारणी जाहीर

सावंतवाडी ता.१५-* मुंबई येथील एस.आर.दळवी फाउंडेशन टीचर टॉक फोरमची दोडामार्ग तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी उदय विठ्ठल गवस यांची तर सचिवपदी श्रीम. तेजा विठू ताटे यांची निवड करण्यात आली आहे.  उपाध्यक्ष कार्यक्रम पदावर अनिल गोविंद ठाकर तर उपाध्यक्ष सदस्य विकास या पदावर कृष्णा शांताराम नाईक यांची निवड झाली आहे आहे. सहसचिव पदासाठी तुषार…

Read More

गोठणे येथे हनुमान जन्मोत्सव

मालवण ता.१५-:* गोठणे येथील आदर्श क्रीडा मंडळ व ग्रामविकास मंडळ, गोठणे-मुंबईतर्फे शनिवार दि. १६ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमानिमित्त गोठणे येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १६ एप्रिल रोजी पहाटे हनुमान पूजा व तीर्थप्रसाद, दुपारी १ ते ३ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ग्रामस्थांची भजने, रात्री १०.३० वाजता रेकॉर्ड डान्स स्पर्धा, दुपारी १२ वाजल्यानंतर देव…

Read More

जुन्या रुढीमध्ये न अडकता बाबासाहेबांच्या मार्गाचा अवलंब करा-डॉ.गाधाडे

वेंगुर्ला ता.१५-:* लढायचं असेल तर संसदेत जाऊन लढा मंदिरामध्ये जाऊन तुमचा उद्धार होणार नाही. कारण, भारतामध्ये कुत्र्या मांजराला किंमत आहे पण आपल्या समाजाला किंमत नाही. या जुन्या रुढीमध्ये न अडकता बाबासाहेबांनी दिलेल्या मार्गावर चालल्यास निश्चित तुमचा उद्धार आहे असे प्रतिपादन डॉ.प्रज्ञाकुमार गाधाडे यांनी वेंगुर्ला येथे केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती वेंगुर्ला तालुका व…

Read More

वेंगुर्ल्यात १९ रोजी आरोग्य मेळाव्याचे आयोजन

*वेंगुर्ला ता.१५-:* केंद्र शासनाकडून जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये दि. १८ ते २२ एप्रिल या कालावधीत जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले असून १९ एप्रिल रजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालय येथे आरोग्य मेळावा होणार आहे. जिल्हा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागामार्फत उपसंचालक-जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या…

Read More

कबड्डी खेळ टिकवून ठेवण्याचे यंगस्टार मित्रमंडळाचे कार्य कौतुकास्पद

यंगस्टार चषक प्रिमिअर लिग कबड्डीचा समीर नलावडे यांच्याहस्ते शुभारंभ कणकवली 15 एप्रिल (प्रतिनिधी)- कबड्डी हा लालमातीतील खेळ असून या खेळाचे वैभव टिकवून ठेवण्याचे काम यंगस्टार मित्रमंडळातर्फे केले जात आहे . ही कौतुकास्पद बाब असून कबड्डीपटूंना हा खेळखेळता यावा म्हणून येथील भालचंद्र महाराज संस्थेच्यालगत नगरपंचायतीने उभारलेल्या क्रीडासंकुलातील कबड्डीचे मैदान कायमस्वरूपी उपलब्ध करून देणार आहे अशी ग्वाही…

Read More

भाकरची विधवा महिला सन्मान कायद्यासाठीची चळवळ लक्षणीय

भाई चव्हाण:आमदार-खासदारांकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधले कणकवली ता.१५-:* पुरोगामी महाराष्ट्रात आजवर अनेक संस्कृती सुधारकांनी पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या अनेक अनिष्ट रुढी परंपरा बंद पाडण्यास भाग पाडले आहे. विधवांनाही पुन:विवाहाचा हक्क मिळवून दिला आहे. मात्र आजही पतीच्या निधनाच्या वेळी पत्नीच्या कपाळावरील कुंकू पुसणे, अंगावरील मंगळसूत्र काढणे, बांगड्या फोडणे, जोडवी काढणे या अनिष्ट प्रथा अमंलात आणल्या जात आहेत. भाकर…

Read More

मालवण शहरात एक दिवस आड पाणी पुरवठा

मालवण ता.१४-:* मालवण नगरपरिषदेच्या धामापूर नळपाणी पुरवठा योजनेमार्फत मालवण शहरात व शहराबाहेर पाणी पुरवठा करण्याात येत असून सद्य:स्थितीत धामापूर तलावक्षेत्रातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत असल्याने आणि अनियमित उच्चदाब विद्यूत पुरवठयामुळे नगरपरिषदेमार्फत मालवण शहरात करण्यात येणारा पाणी पुरवठा दि. १६ एप्रिल पासून एक दिवस आड करण्यात येईल, अशी माहिती नगरपालिका प्रशासनाने दिली आहे. शहरातील सर्व…

Read More

कोळंब येथे नाटेकर आजी पुण्यतिथी कार्यक्रम

*⚡मालवण ता.१४-:* हनुमान जयंती दिनी १६ एप्रिल रोजी कोळंब येथील प. पू. नाटेकर आजींचा २७ वा पुण्यतिथी सोहळा होणार आहे. या निमित्त सकाळी ८.३० वाजता दुग्धाभिषेक, लघुरुद्र, १०.३० वा. त्रिमूर्ती भक्ती सुगम संगीत, ११.३० वा. महाआरती, दुपारी १२ वा. प. पू आनंद काडसिद्धेश्वर महाराज यांच्या हस्ते स्मरणिका प्रकाशन, वाजता महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता कलावती आर्ट…

Read More

पराड दुर्गादेवी मंदिर वर्धापन दिन ५ मे रोजी

मालवण ता.१४-:* मालवण तालुक्यातील पराड येथील श्री दुर्गा देवी मंदिराचा वर्धापन दिन ५ मे रोजी साजरा होणार आहे. सकाळपासून यज्ञमहोत्सव, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता सत्यनारायण महापूजा, रात्री ८ वाजता भजने, ९ वाजता स्थानिक मुलामुलींचे कार्यक्रम, १० वाजता अष्टविनायक दशावतार नाट्य मंडळ निरवडे यांचे नाटक होणार आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read More
You cannot copy content of this page