मालवण ता.१४-:* मालवण नगरपरिषदेच्या धामापूर नळपाणी पुरवठा योजनेमार्फत मालवण शहरात व शहराबाहेर पाणी पुरवठा करण्याात येत असून सद्य:स्थितीत धामापूर तलावक्षेत्रातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत असल्याने आणि अनियमित उच्चदाब विद्यूत पुरवठयामुळे नगरपरिषदेमार्फत मालवण शहरात करण्यात येणारा पाणी पुरवठा दि. १६ एप्रिल पासून एक दिवस आड करण्यात येईल, अशी माहिती नगरपालिका प्रशासनाने दिली आहे.
शहरातील सर्व नळधारकांनी नोंद घेऊन नगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
