*वेंगुर्ला ता.१५-:* केंद्र शासनाकडून जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये दि. १८ ते २२ एप्रिल या कालावधीत जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले असून १९ एप्रिल रजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालय येथे आरोग्य मेळावा होणार आहे.
जिल्हा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागामार्फत उपसंचालक-जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली सर्व आरोग्य यंत्रणा सहभागी होणार आहेत. सर्व कार्यक्रमाचे नडल ऑफिसर हे जिल्हा शल्य चिकित्स असणार आहेत. कान, नाक, घासा भिषक, त्वचा, नेत्र, दंत, स्त्रीरोग तज्ज्ञ व बालरोगतज्ज्ञ हे डॉक्टर यावेळी रुग्णांची तपासणी करणार आहेत. या मेळाव्यात सहभागी होणा-या नागरिकांसाठी आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड काढून देण्यात येणार आहेत. त्यासाठी नागरिकांनी मोबाईल लिक केलेले आधारकार्ड आणणे आवश्यक आहे.
विविध आणि कुटुंब कल्याण कार्यक्रमाबद्दल जागरुकता निर्माण करणे, आयुष्यमान भारत हेल्थ अॅण्ड वेलनेस सेंटर, पीएएम जन आरोग्य योजना, युनिक हेल्थ आयडी तयार करण्याची सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ.वजराटकर यांनी वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालय येथील झालेल्या सभेत दिली. या आरोग्य मेळाव्याला गरजूंनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
