Headlines

सेवांगणच्या विविध स्पर्धांचा निकाल जाहीर

मालवण ता.१५-:* मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे नर्सिंग असिस्टंट आणि शिवणकला वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या दोन्ही वर्गातील विद्यार्थिनींसाठी कथाकथन, गीतगायन आणि संगीतखुर्ची स्पर्धेचे आयोजन सेवांगणने केले होते.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे- गीतगायन स्पर्धा- प्रथम सुगंधी कांदळगावकर, द्वितीय- मिताली कांबळी, तृतीय सोनाली कांबळी, कथाकथन स्पर्धा- प्रथम-गौरी मेस्त्री, द्वितीय -ऐश्वर्या मंचेकर, संगीतखुर्ची प्रथम ममता लुडबे, द्वितीय तरन्नुम पटेल यांनी क्रमांक प्राप्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शुभांगी सुकी होत्या. वैष्णवी आचरेकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. संस्थेतील कर्मचारी संजय आचरेकर, रुचिरा चिंदरकर, सोनाली कोळंबकर पंढरी सावंत, मनोजकुमार गिरकर, संजयकुमार रोगे, आदिती कुडाळकर, शीतल कदम, पूनम सूर्के, शैलजा मयेकर यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. विजेत्या स्पर्धकांना फुलझाडे आणि वाचनीय पुस्तके बक्षीस रुपाने देण्यात आली.

You cannot copy content of this page