गोठणे येथे हनुमान जन्मोत्सव

मालवण ता.१५-:* गोठणे येथील आदर्श क्रीडा मंडळ व ग्रामविकास मंडळ, गोठणे-मुंबईतर्फे शनिवार दि. १६ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमानिमित्त गोठणे येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

१६ एप्रिल रोजी पहाटे हनुमान पूजा व तीर्थप्रसाद, दुपारी १ ते ३ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ग्रामस्थांची भजने, रात्री १०.३० वाजता रेकॉर्ड डान्स स्पर्धा, दुपारी १२ वाजल्यानंतर देव गौतमेश्वर नाट्य मंडळ, दाभोली यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आदर्श क्रीडा मंडळाने केले आहे.

You cannot copy content of this page