कणकवली ता.१५-:* कठोर मेहनत,शिस्त, संयम आणि सातत्य ठेवून आपल्या जिल्ह्यातील मुलांनी अभ्यास करावा यश नक्की मिळेल असे प्रशासकीय अधिकारी गितांजली नाईक यांनी केले आवाहन युनिक अकॅडमी कणकवलीचा सलग ८ ते १८ तास अभ्यास उपक्रम प्रसंगी प्रशाकीय अधिकारी गितांजली नाईक यांनी केले. १४ एप्रिल.. बाबासाहेब डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून, विद्यार्थीदशेतील त्यावेळच्या परिस्थितीला समोरे जात केलेली डॉ.आंबेडकर यांनी १८ ते २१ तास अभ्यास करून कमी कालावधीत केलेली जागतिक दर्जाची शैक्षणिक क्रांती आजच्या विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवून आणि उपलब्ध सर्व सोयी सुविधांचा योग्य वापर करून ध्येय्य गाठावे यासाठी सलग किमान ८ ते जास्तीत जास्त १८ तास अभ्यासाचा संकल्प सर्व विद्यार्थ्यांनी करावा आणि स्वतःचे ध्येय्य गाठावे याकरिता हा उप्रकम घेण्यात आला होता.
या कार्यक्रमास, कुडाळच्या प्रशासकीय अधिकारी गितांजली लक्ष्मण नाईक,चैतन्य क्लासेस कणकवलीचे संचालक अच्युत देसाई , नेहा खोत, अश्विनी लिंगायत उपस्थित होत्या. गितांजली नाईक यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनानिमित्त केक कापला आणि सर्व विद्यार्थ्यांना थंड पेय व चहा बिस्कीट ची सोय केली. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर सखोल मार्गदर्शन केले त्याबद्दल मुलांनी समाधान व्यक्त केले. या प्रसंगी, मा.अच्युत देसाई यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल चे अनमोल विचार मांडून विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी योग्य मार्गदर्शन केले. सदर उपक्रमात स्नेहा गोसावी, दीपक लाड, राशी मुंज,भक्ती जाधव,सानिया मुल्ला,राजू नाईक,विशाल आडीवरेकर अशा विद्यार्थ्यांनी अकॅडमीत येऊन आणि आपापल्या घरातून सहभाग दर्शवला.
