कणकवली बाल गोपाळ हनुमान मंदिरात उद्या हनुमान जन्मोत्सव

विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

कणकवली ता.१५-:* कणकवली येथील बाल गोपाळ हनुमान मंदिर कांबळे गल्ली येथे प्रतिवर्षाप्रमाणे शनिवार 16 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव साजरा होणार आहे.या जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रम – सकाळी 6.30 वा.हनुमान जन्म,तीर्थ प्रसाद,दुपारी 1.00वा.आरती व महाप्रसाद,दुपारी 3.00 वा.श्री सत्यनारायणाची महापूजा सायंकाळी 5.00 वा.आरती सायंकाळी 5.30 ते 8.00 वा. भजनांचा भरगच्च कार्यक्रम व दैनंदिन आरती,रात्रौ 8.30 वा.बाळगोपाळ हनुमान मित्रमंडळ,कांबळे गल्ली,कणकवलीतील स्थानिक कलाकारांचा धमाकेदार जल्लोष 2022 सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून या सर्व कार्यक्रमांचा अवश्य लाभ घेण्याचे आवाहन बालगोपाल हनुमान मंदिर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page